ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचं अल्टिमेटम अजिबात नाही, उलट २४ तारखेला  कोल्हापूरच्या सभेला येण्याचं निमंत्रण -आ.मेटे 


बीड (रिपोर्टर):- शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी बीड बाबत घेतलेेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटेंना अल्टिमेट दिल्याच्या बातम्या बाहेर पडल्या. मात्र कालच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे मेटेंना अल्टिमेट दिलं असं कुठं दिसून आलं नाही. याबाबत मेटेंनी रिपोर्टरला सांगितले, मला मुख्यमंत्र्यांनी कुठलंही अल्टिमेटम दिलं नाही उलट २४ तारखेला कोल्हापूर येथे होणार्‍या आघाडीच्या सभेला आणि बैठकीला तुम्ही उपस्थित रहायचय, असं आमंत्रण दिलं. बीडबाबत काय ते नंतर बघू असं म्हणून मेटेंनी आपण भूमिका घेतल्यानंतर चंद्रकांत दादांसह सुधीर मुनगंटीवारांनी आपण एकत्रित आहोत, बीडबाबत आपण सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, आी विनंती केल्याचे त्यांनी म्हटले. 
   बीड जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात एकीकडून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह शिवसैनिक नाराजी आणि संताप आपल्या नेत्यांसमोर व्यक्त करत असतानाच शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटेंनी गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यात युती परंतु बीड जिल्ह्यात काम करणार्‍यांनाही ही भूमिका उघड केल्यानंतर भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. काल औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर सभेतून आ.मेटेंना अल्टिमेटम दिल्याचे बातम्या आल्या, परंतु मुख्यमंत्री आपल्या भाषणात अत्यंत समजूतदारीच्या सुरात आपण सर्व एक आहोत, एकत्रित काम करावं लागेल, असे सांगताना दिसून आले. याबाबत रिपोर्टरला आ. मेटेंनी सांगितले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला कुठलेही अल्टिमेटम दिलेले नाही, त्यांची भेट नाही, साधा निरोपही नाही, अल्टिमेटम तर अजिबात नाही, उलट २४ तारखेला कोल्हापूरमध्ये महायुतीची बैठक आणि जाहीर सभा आहे. त्याला उपस्थित राहण्याबाबत आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी आपणास दिलं असल्याचे सांगितले. त्याअगोदर चंद्रकांतदादा, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह एक-दोन जणांनी आपण एकत्रित लढत आहोत, आपल्याला सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे, राज्यात आणि देशात सत्ता आणायची आहे त्यामुळे तुम्ही बीडमध्ये काम करावं, अशी विनंती त्यांनी केली. आज अल्टिमेटमच्या आलेल्या बातम्यांबाबत विचारले असता आपल्याला कुठलेही अल्टिमेटम मुख्यमंत्र्यांकडून आलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून बीडच्या बाबत काय ते नंतर बघू, असेही मेटे म्हणाले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review