ताज्या बातम्या

पर्रीकरांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार 


पणजी (वृत्तसेवा):-गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पार्थीवदेह आज सकाळी भाजपाच्या मुख्यालयामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी साश्रूनयनांनी पर्रीकर यांचे अंत्यदर्शन घेतले. नितीन गडकरी यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांचे मान्यवर नेत्यांनी मनोहर पर्रीकर यांना श्रध्दांजली अर्पण केली. सायंकाळी पाच वाजता पर्रीकरांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही गोव्या डेरेदाखल झाले आहेत. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत जडणघडण झालेले मनोहर पर्रीकर यांचा राजकीय आलेख कर्तृत्व कर्मातून उंचावलेला असल्याने त्यांच्या आकस्मिक जाण्याने अवघा देश हळहळला. ६३ वर्षीय पर्रीकर यांचा स्वादूपिंडाच्या कर्करोगाने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आज केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. पर्रीकरांच्या निधनामुळे देश शोकाकुल झाला असून आज सकाळपासून त्यांचा पार्थीवदेह अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयामध्ये ठेवला आहे. हजारोंच्या संख्येने समर्थकांनी आणि सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी पर्रीकरांचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रध्दांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंत्यविधीसाठी गोव्यात दाखल झाले आहेत.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review