उठा, खांद्याला खांदा लावून काम करा  राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे,खा. पवारांची बीडच्या नेत्यांना सूचना


खा. पवारांची बीडच्या नेत्यांना सूचना, पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक, उमेदवार ठरला, इतर उमेदवारांसोबत घोषणा होणार 
मुंबई (रिपोर्टर):- बीड लोकसभा मतदारसंघाची आजची परिस्थिती राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसह नेत्यांकडून ऐकून घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवारांनी उठा, खांद्याला खांदा लावून काम करा अन् कुठल्याही परिस्थितीत बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी करा, अशा सूचना देत राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकारी आणि नेत्यांना एकत्रित येऊन काम करण्याची सूचनाच नव्हे तर तंबी पवारांनी दिली. बीडचा उमेदवार इतर उमेदवारांच्या घोषणांबरोबर घोषित केला जाईल, असेही म्हटले. आज सायंकाळी किंवा येणार्‍या ४८ तासात राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांबरोबर बीडच्या उमेदवाराची घोषणा होणार आहे. 
ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस लोकसभेची निवडणूक लढवत अहे, त्या मतदारसंघातील पदाधिकार्‍यांसह नेत्यांसोबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गेल्या दोन दिवसांपासून बैठका सुरु आहेत. आज बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची आणि पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक  धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आज सकाळी ११ वाजता सुरु झाली. या बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनिल तटकरे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. तर बीडमधून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आ. पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, अक्षय मुंदडा यांच्यासह अन्य नेत्यांची आणि पदाधिकार्‍यांची या बैठकीला हजेरी होती. तब्बल दीड ते दोन तासाच्या बैठकीमध्ये खा. पवारांनी बीड जिल्ह्याची मतदारसंघनिहाय परिस्थिती जाणून घेतली. उपस्थित नेत्यांना आणि पदाधिकार्‍यांना उठा, खांद्याला खांदा लावून काम करा, राष्ट्रवादीचा उमेदवार लोकसभेत पाठवा. एकदिलाने आणि एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देत आता गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, आी तंबीही दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस इतर उमेदवारांची यादी जाहीर करेल तेव्हा बीडच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल, त्यामुळे आज सायंकाळी किंवा येणार्‍या ४८ तासात बीडच्या उमेदवाराची घोषणा होईल.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review