बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून तटकरेंना उमेदवारी, राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून तटकरेंना उमेदवारी, राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

मुंबई: -

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर केली. बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयन राजे भोसले यांच्यासह इतर नावे जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. कल्याणमधून बाबाजी पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे यांचीही नावं जाहीर करण्यात आली आहेत.

आज पार्थ पवार यांचं नाव मात्र जाहीर करण्यात आलं नाही. याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा त्याचा निर्णय योग्य वेळी जाहीर करू असं त्यांनी म्हटलं आहे तो निर्णय आमच्या मनाप्रमाणे जाहीर करू द्या असं जयंत पाटील यांनी मिश्किलपणे म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पार्थसाठी माघार घेतल्याचे सांगितले होते. तरीही पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

१) सुप्रिया सुळे-बारामती
२) सुनील तटकरे-रायगड
३) उदयनराजे भोसले-सातारा
४) आनंद परांजपे- ठाणे
५) बाबाजी पाटील-कल्याण
६) धनंजय महाडीक-कोल्हापूर
७) मोहम्मद फैजल-लक्षद्विप
८) संजय दीना पाटील-ईशान्य मुंबई
९) राजेंद्र शिंगणे-बुलडाणा
१०) गुलाबराव देवकर-जळगाव
११) राजेश विटेकर-परभणी

हातकणंगले या ठिकाणी राजू शेट्टींना राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल असे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता राष्ट्रवादीची इतर उमेदवारांची यादी पुढील दोन दिवसात जाहीर होणार आहे असेही पाटील यांनी सांगितले. मुंबईतील धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review