नगर मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही; विखे-पाटील यांची भूमिका


मुंबई (रिपोर्टर):- ’भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सुजयनं माझ्याशी चर्चा करून घेतलेला नाही. तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता. असं असलं तरी त्याच्या विरोधातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार मी करणार नाही,’ असं कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज स्पष्ट केलं. तसंच, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून घेईन,’ असंही त्यांनी सांगितलं.
’भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सुजयनं माझ्याशी चर्चा करून घेतलेला नाही. तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता. असं असलं तरी त्याच्या विरोधातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार मी करणार नाही,’ असं कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज स्पष्ट केलं. तसंच, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून घेईन,’ असंही त्यांनी सांगितलं. सुजय विखे यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं पक्षांतर्गत विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज प्रथमच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुलाच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयापासून हात झटकले. सुजय भाजपमध्ये जाण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसची आडमुठी भूमिका जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी अप्रत्यक्षरित्या केला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ जागावाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडं आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीनं सुजयसाठी सोडावा, असा विखेंचा आग्रह होता. मात्र, राष्ट्रवादीनं त्यास ठाम नकार दिला. उलट दुसर्‍यांच्या मुलांचे हट्ट आम्ही का पुरवू, असं पवार यांनी सुनावलं होतं. पवार यांच्या या वक्तव्याबद्दल व राष्ट्रवादीच्या एकूण भूमिकेबद्दल विखेंनी संताप व्यक्त केला.
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review