धनंजय मुंडेंच्या प्रस्तावावर नक्कीच विचार करेन - ना पंकजा मुंडे

पुणे ऑनलाईन रिपोर्टर 

    मराठवाडा प्रोफेशनल क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांनी' एखादी संस्था मराठवाड्यात आणून दाखवावी तेव्हाच मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही दोघ मिळून कोणाशीही भांडण्यास तयार असल्याच विधान धनंजय मुंडे यांनी केले होते. यानंतर आता या बाबत ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांना विचारल असता ‘धनंजय मुंडेच्या या प्रस्तावाचा नक्की विचार करेन’ असे सांगत, त्यांच्या विधानाशी सकारात्मकता दाखवली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या
धनंजय मुंडे यांनी ‘ज्यांना ऊस तोड कामगारांचे प्रश्न कळत नाहीत त्यांच्याकडे ऊस तोडणी कामगारांचे महामंडळ असल्याची’ टीका पंकजा मुंडे यांच्यावर केली होती. याला प्रत्युत्तर देताना ‘सत्ता असताना ऊस तोडणी कामगारांसाठी महामंडळ स्थापन केलं असत तर नेतृत्व त्यांच्याकडेच असत. मात्र ते सुचल नसल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली. 
 

अधिक माहिती: pankajamunde

Best Reader's Review