फडणवीस साहेब, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय!’


मुंबई (रिपोर्टर):- मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवाळी निमित्त व्यंगचित्रांची एक मालिका सध्या प्रसिद्ध करत आहेत. आज नरक चतुर्दशी निमित्त राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
या व्यंगचित्रात अभ्यंगस्नानाला बसलेले फडणवीस आणि त्यांच्या घराबाहेर जमा झालेली महाराष्ट्रातील संतप्त जनता दाखवली आहे. ’साहेब... अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय! पाठवू ?’ असे एक जण येऊन त्यांना कानात सांगत आहे अशा आशयाचे हे बोचरे व्यंगचित्र राज यांनी रेखाटले आहे. 
या सोबतच राज यांनी नरकचतुर्दशी निमित्त आणखी एक व्यंगचित्र रेखाटले आहे. अमित शहा हे भाजपला पडलेलं दिवाळी पहाटेचं स्वप्न आहे असा टोला राज यांनी लगावला आहे. या व्यंगचित्रात अमित शहा यांनाच नरकासुराच्या रुपात दाखवले आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी कारेटे पायाखाली तुडवण्याची प्रथा आहे. राज यांनी अमित शहा यांनाच कारेटेच्या रुपात रेखाटले आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review