जगावेगळी अंत्ययात्रा चित्रपटात बीडचा भूमिपुत्र

२३ मार्चला राज्यातील दीडशे थिएटरमध्ये होणार रिलीज
बीड (रिपोर्टर):- समाजाच्या गहन प्रश्‍नाबाबत ‘जगावेगळी अंत्ययात्रा’ हा चित्रपट बनवण्यात आला असून या चित्रपटात बीडचे भूमिपुत्र डॉ. विशाल गोरे हे महत्वाची भूमिका साकारत आहेत. सदरील चित्रपट २३ मार्च रोजी राज्यातील १५० थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाबाबत जिल्हावासियांसह राज्यातील मराठी प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे. 
समाजामध्ये आज वेगवेगळे प्रश्‍न असून समाजाच्या विविध प्रश्‍नांबाबत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी ‘जगावेगळी अंत्ययात्रा’ हा आगळावेगळे चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये शहरातील प्रसिद्ध सीए बी.बी. जाधव यांचे मेव्हणे डॉ. विशाल गोरे हे महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. विशाल गोरे हे सोलापूर येथे प्रॅक्टीस करत असून ते अनावधानाने या चित्रपटामध्ये आले असून त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. या चित्रपटात भाऊ कदम यांचीही भूमिका असल्याने चित्रपटाबाबत बीड जिल्ह्यासह राज्यातील मराठी प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे. २३ मार्च रोजी दीडशे चित्रपटगृहातून हा चित्रपट झळकणार आहे. या चित्रपटाचे निर्माते नितीन तोष्णीवाल व दिग्दर्शक अमोल लहाडे हे आहेत. चित्रपटासाठी सुरेश वाडकर, वैशाली सामंत यांनी गायन केले.  विशाल गोरे यांनी आज हॉटेल नीलकमल यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रपटाबाबतची माहिती बीडच्या पत्रकारांना दिली. या वेळी त्यांच्या समवेत सी.ए. जाधव यांची उपस्थिती होती.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review