ताज्या बातम्या

आदर्श आचारसंहितेचे पालन करा -उपजिल्हाधिकारी ठाकूर यांचे आवाहन

आदर्श आचारसंहितेचे पालन करा
-उपजिल्हाधिकारी ठाकूर यांचे आवाहन
माजलगाव मतदार संघात ३ लाख ३१ हजार मतदार
माजलगाव (रिपोर्टर):- विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी असे आवाहन करत माजलगाव मतदार संघामध्ये तीन लाख ३१ हजार दहा मतदार आहेत. एकूण ३८४ मतदान केंद्र असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ठाकूर यांनी दिली.
     निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी पत्रकार परिेषदेचे आयोजन केले होते यावेळी त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेला तहसीलदार गोरे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना ठाकूर म्हणाल्या की, माजलगाव मतदार संघामध्ये एकूण ३ लाख ३१ हजार १० मतदार आहेत. त्यातील पुरूष एक लाख ७५ हजार १८९ तर महिला १ लाख ५५ हजार ८२१ आहेत. एकूण मतदान केंद्राची संख्या ३८४ असून मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ६५६ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. मतदानासाठी १७२० मशिन आहेत. ४ चेक पोस्टची राहणार असून धारूर, वडवणी आणि माजलगाव याठिकाणी चेक पोस्ट असणार आहेत. नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ठाकूर यांनी केले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review