ताज्या बातम्या

प्रस्थापीत नेत्यांनी कंकालेश्वरसह शहेंशाहवली दर्ग्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले -आ. मेटे

प्रस्थापीत नेत्यांनी कंकालेश्वरसह शहेंशाहवली दर्ग्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले -आ. मेटे
आ. मेटेंच्या हस्ते शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन
बीड (रिपोर्टर):- मला बीडचा विकास करायचा आहे, सर्वांना सोबत घेऊन विकास कामाला प्राधान्य द्यायचा आहे, इथल्या प्रस्थापित नेत्यांनी जाणीवूपर्वक श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिर देवस्थान आणि शहेंशाहवली दर्ग्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. परंतु आता ‘विकास हीच जात आणि विकास हाच धर्म’ मानून सर्व धार्मिकस्थळांसह लोकांचे मुलभूत प्रश्‍न सोडवणे हेच माझे लक्ष्य असेल, असे आ. विनायक मेटे म्हणाले. 
   शहरातील श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिर देवस्थानाचे ४ कोटी ८ लाखाच्या कामाचे आज आ. विनायक मेटे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या कार्यक्रमासाठी शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शहरातील सुप्रसिद्ध शहेंशाहवली दर्गा या ठिकाणी २.१५ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आ. मेटेंनी केले. शहरातील विविध ३५ मस्जिदींसमोर पथदिवे आज बसवण्यात आले. विकास हीच आमची जात, ‘विकास हाच आमचा धर्म’ हे ब्रिद घेऊन आपण विकासाला प्राधान्य देत असल्याचे मेटेंनी सांगितले. ठिकठिकाणी विकास कामाच्या भूमिपूजना दरम्यान अनेक लोक आ. मेटेंना भेटले त्यांच्या अडीअडचणी सांगितल्या, ते सोडविण्याचे आश्‍वासन आ. मेटेंनी उपस्थितांना दिले. मला विकास करायचं असल्याचे सांगत बीडच्या प्रस्थापित नेत्यांनी कंकालेश्वर, शहेंशाहवली दर्ग्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वांना सोबत घेऊन आपण सर्व धार्मिक स्थळांच्या विकास कामात लक्ष घालणार असून लोकांचे मुलभूत प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review