ताज्या बातम्या

केजमध्ये मजूराला ट्रकने चिरडले

केज (रिपोर्टर):- ट्रॅक्टरसाठी डिझेल आणण्यासाठी जात असतांना मोटार सायकल स्लिप होवून दोघे जण खाली पडले. यात एक जण पाठीमागून येत असलेल्या ट्रकच्या टायरखाली गेल्याने तो जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी ९.३० वाजता अंबाजोगाई रोडवरील डीवायएसपी कार्यालयासमोर घडली. त्यामध्ये एक जण जखमी झाल्याने त्यास उपचारार्थ रूग्णालयातत दाखल करण्यात आले. 
प्रकाश हिराजी कोमटे (वय २६ वर्षेे रा.मांडकगाव जि.परभणी), विलास मारे (वय २३ रा.लोणा ता.कंधार जि.नांदेेड) हे मजूर चिंचोली फाटा येथे खडी क्रेशरवर कामाला आहेत. हे दोघे जण आज सकाळी ट्रॅक्टरसाठी डिझेल आणण्यासाठी मोटरसायकल क्रमांक एम.एच.२६ बीए १४३३ यावर जात होते. अंबाजोगाई रोडवर असलेल्या डिवायएसपी कार्यालयासमोर यांची मोटारसायकल स्लिप झाली आणि ते दोघे खाली पडले. तितक्यात पाठीमागून भरधाव वेगात येणारी ट्रक क्रं.एम.एच.१६ ए.वाय. ५८५९ या दोघांना धडक दिली. त्यातील प्रकाश कोमटे ( वय २६) हा ट्रकच्या टायरखाली आल्याने त्याच्या शरिराचा चेंदामेंदा झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती पत्रकार सय्यद माजेद, पो.कॉ.नामदास, करवंदे, सामाजिक कार्यकर्ते रंजित खोडसे, अक्षय गिते यांना झाल्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेतली होती. या प्रकरणी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review