ताज्या बातम्या

बीड शहर राष्ट्रवादीमय

जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा- संदीप क्षीरसागर

बीड (रिपोर्टर)ः- राष्ट्रवादी पक्षाची शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्यामध्ये दाखल असून या यात्रेचे ठिकठिकाणी जंगी स्वागत होवून जाहीर सभा होत आहे. ही यात्रा आज बीड शहरामध्ये येणार आहे. बीड राष्ट्रवादीमय झाले असून या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
महाराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शिवस्वराज्य यात्रा काढली. ही यात्रा काल पासून बीड जिल्ह्यात आहे. आज दुपारी चर्‍हाटा फाटा या ठिकाणाहून मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. बीडमध्ये यात्रा येणार असल्याने संपुर्ण शहर राष्ट्रवादीमय झाले आहे. यात्रेचा समारोप सायंकाळी सिध्दी विनायक कॉम्पलेक्स या ठिकाणी होणार आहे. या सभेला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आदि मान्यवर मंडळी मार्गदर्शन करणार आहे. या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
दरम्यान बीड मध्ये राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सहा संचालेला होता. बीड शहरासह तालुकाभरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते याजाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. 
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review