ताज्या बातम्या

मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत निराधारांची बैठक

बीड (रिपोर्टर):- बीड तालुक्यातील निराधार व महिला बचत गटांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी व याबाबत चर्चा करण्यासाठी सामाजिक न्याय भवनात महिलांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर मार्गदर्शन करणार आहेत. 
   बीड तालुक्यामध्ये शेकडो निराधार महिलांची संख्या आहे. निराधारांचे प्रश्‍न सातत्याने ऐरणीवर असतात. त्यातच महिला बचत गटांच्याही समस्या असतात. या सर्व समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी सामाजिक न्याय भवनामध्ये निराधार महिला व बचत गटाच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला रोहयो फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी बारा वाजता बैठकीला सुरुवात झाली होती. या वेळी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, विलास बडगे, बाजार समितीचे सभापती कदम सह आदींची उपस्थिती होती. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review