ताज्या बातम्या

एफआरपीची रक्कम थकविली, ‘जयमहेश’ सील

इतर कारखान्यांनाही नोटीसा बजावण्यात येणार -थावरे

बीड (रिपोर्टर):- सहकारी साखर कारखान्यांकडे एफआरपीची थकित रक्कम असल्याने या कारखान्याने रक्कम अदा केलेली नाही. साखर संचालकांच्या आदेशानुसार माजलगावच्या तहसीलदारांनी जयमहेश कारखान्याला सील केले असून इतर कारखान्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे गंगाभीषण थावरे यांनी म्हटले आहे.
  एफआरपीच्या रकमेसाठी गंगाभीषण थावरे यांनी हायकोर्टात याचीका दाखल केली होती. न्यायालयाने संबंधित कारखान्यांना पैसे देण्याचे आदेश दिले होते मात्र कारखान्याने पैसे दिले नसल्याने उद्या न्यायालयासमोर काळ्या पट्‌ट्या तोंडाला बांधून बसण्याचा इशारा थावरे यांनी दिला होता. याची दखल साखर संचालकांनी घेतली आणि माजलगावच्या जयमहेश सहकारी साखर कारखान्याला सील केले असून अन्य थकित एफआरपी असलेल्या कारखान्यांना नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे गंगाभीषण थावरे यांनी म्हटले आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review