न.प.कडून मलेरिया विभागाचे १८ महिन्यांचे पगार थकले

न.प.कडून मलेरिया विभागाचे १८ महिन्यांचे पगार थकले
३८ कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण
बीड (रिपोर्टर):- बीड नगर परिषद अंतर्गत मलेरिया विभागामध्ये ३८ कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून काम करत आहेत. गेल्या १८ महिने झाले तरी कर्मचार्‍यांच्या खात्यावर त्यांचा मासिक पगार टाकलेला नसल्याने शेवटी कर्मचार्‍यांनी नगर पालिकेसमोर अमरण उपोषण सुरू केले. तसेच याचे मुख्याधिकारी नगर परिषद, जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. 
बीड नगर परिषदेमध्ये फक्त काम करा पैसे मागू नका असाच प्रकार चालल्याचे दिसून येत आहे. गेल्या अठरा महिन्यापासून ३८ कर्मचारी काम करत आहेत. मात्र अठरा-अठरा महिने उलटूनही त्यांच्या खात्यावर एक रूपयाही जमा केलेला नाही. मात्र नगर परिषदेतील मलेरिया वभागाचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे. तरी नगराध्यक्ष यांचे सदरील विभागाकडे साफ दुर्लक्ष आहे. याप्रकरणी गेल्या अठरा महिन्यापासून वेळोवेळी पालिकेला निवेदन देण्यात आले. मात्र फक्त काम करा पैसे मागू नका असाच त्यांचा प्रकार असल्याचे दिसून आले शेवटी हतबल होवून ३८ कर्मचार्‍यांनी नगर पालिकेसमोर बेमुदत उपोेषण सुरू केले आहे. तसेच याच्या सखोल चौकशीसाठी मुख्याधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी पाण्डेय यांनाही निवेदन देण्यात आले. जोपर्यंत आमच्या खात्यावर आमचा अठरा महिन्याचा पगार जमा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाहीत असा इशाराही उपोषण धारकांनी आज दिलाा. 

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review