ताज्या बातम्या

गेवराई तालुक्यात आ.लक्ष्मण आण्णाच खरा ब्रँड - ना.पंकजाताई मुंडे

गेवराई तालुक्यात आ.लक्ष्मण आण्णाच खरा ब्रँड - ना.पंकजाताई मुंडे

2014 पेक्षा जास्त गेवराई भाजपा सदस्य नोंदणी करू - आ.लक्ष्मण पवार

पंकजाताई मुंडे व आ.पवारांच्या उपस्थित गेवराईत भाजपा सदस्य नोंदणीचा शुभारंभ

गेवराई (रिपोर्टर) लोकसभा निवडणुकीत गेवराईत राष्ट्रवादीच्या पंडितांनी खुपच आव आणला होता,पण गेवराईच्या जनतेने कार्यसम्राट आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला प्रचंड मताधिक्य दिले. त्यामुळे देशात जसा भाजप जनतेचा ब्रँड झाला तसे आ.लक्ष्मण पवार हेच आता तालुक्यातील जनतेचा खरा ब्रँड असल्याचे प्रतिपादन ना.पंकजाताई मुंडे यांनी करत राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेत राष्ट्रवादी रिकामी केली आहे. तर ज्यांनी पंडितांच्या राजकारण सांभाळले त्याच कार्यकर्त्यांना त्यांनी गुलामीची वागणूक दिली. पण गेवराई विधानसभा मतदारसंघात आ.पवार हे एक प्रामाणिक आमदार म्हणून ओळख झाल्याने यापुढेही गेवराईची जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्यांना पुढच्या निवडणुकीतही साथ देईल असा विश्वास व्यक्त करत भाजपा कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करून घ्यावी असे आवहान ही ना.पकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलताना केले. गेवराई शहरातील भाजपाच्या संपर्क कार्यालयात भाजपा सदस्य नोंदणी शुभारंभ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश सोहळा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आ. लक्ष्मण पवार, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत क-हाड,भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे,शाम बापु पवार,नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ,उपनगराध्याक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर,शिवराज पवार,जे. डी शहा,यांच्यासह आदीची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या की गेवराईचे आ.लक्ष्मण पवार नेहमीच माझा कमी वेळ घेतात पण मतदान पेटीतून जास्तीत मताधिक्य देतात. येणा-या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल असा विश्वास व्यक्त करुन कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे अवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना आ.लक्ष्मण पवार म्हणाले की गेवराई सन 2014-15 ला गेवराई विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकार्त्यांनी भाजपाची सदस्य नोंदणी केली होती. त्यापेक्षा जास्त सदस्य नोंदणी गेवराई भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यावेळी करतील असा विश्वास आ.लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केला. यावेळी चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास बामणे, जि.प.सदस्य प्रल्हाद माने, पांडूरंग थडके,रंजना बडे, आदि उपस्थित होते. या कार्यक्रमात शहरातील राष्ट्रवादीचे युवानेते भवानी अर्बन बॅंकेचे मा.संचालक प्रभाकर भालशंकर, दिलीप सोनवणे, बाळासाहेब खंडागळे,संतोष यादव,यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला. या सर्वाचा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी सत्कार करून भाजपात जाहीर प्रवेश दिला. यावेळी नगरसेवक,बुथप्रमुख,शक्तीप्रमुख, यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review