ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभार प्रभारी अधिकार्‍यावर 

जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभार प्रभारी अधिकार्‍यावर 
बीड (रिपोर्टर):- जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये अनेक पदे रिक्त असल्याने एकाएका अधिकार्‍याकडे दोन-दोन पदे देण्यात आली आहेत. शासनाकडून पदे भरली जात नसल्याने प्रभारी पदावर कारभार हाकला जात आहे. जिल्ह्यातल्या नऊ गटशिक्षणाधिकारी प्रभारी पदावर चालत आहेत. विस्तार अधिकार्‍याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा कारभार सोपवण्यात आलेला आहे. 
बीड जिल्ह्यातल्या अनेक कार्यालयात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. या रिक्त जागा राज्य सरकार वेळेवर भरत नसल्याने अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांना कामाचा ताण सहन करावा लागतोे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातही अनेक पदे रिक्त आहेत. नऊ गटशिक्षणाधिकारी पदावर प्रभारी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. आष्टीच्या गटशिक्षणाधिकारीपदी प्रभारी म्हणून धनंजय शिंदे, पाटोदा बोंदाडे, शिरूरकासार शेख जमील, माजलगाव महामुनी, केज केंद्रे, अंबाजोगाई राऊत, परळी गिरी, बीड जाधव आणि धारूर टोकडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फक्त वडवणी आणि गेवराई गटशिक्षणाधिकारीपदी कायमस्वरूपी अधिकारी आहे. इतर तालुक्याचा कारभार प्रभारीवर चालत आहे. 
निरंतर शिक्षण अधिकारपदही रिक्त
जिल्हा परिषदेचे निरंतर शिक्षण अधिकारी पद हे गेल्या काही दिवसापासून रिक्त आहे. या पदावर अद्यापही अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली नाही. या पदाचा कारभार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी ही काही दिवसासाठी रजेवर गेले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review