ताज्या बातम्या

परळी शहर कडकडीत बंद

परळी शहर कडकडीत बंद
तहसील कार्यालयावर मोर्चा; तबरेज अन्सारीच्या मारेकर्‍यांना कठोर शासन करा
परळी (रिपोर्टर):- झुंडशाहीची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत असून या प्रकाराला आळा घालण्यास केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. झारखंड राज्यातील तबरेज अन्सारी या तरूणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलन मोर्चे काढले जात आहेत. आज परळी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदमध्ये सर्व व्यापार्‍यांनी सहभाग घेतला होता. मुस्लिम बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले. 
गेल्या काही दिवसापूर्वी झारखंड राज्यामध्ये तबरेज अन्सारी या तरूणाची काही जातीयवादी लोकांनी निर्घृणपणे हत्या केली. या हत्येचे देशभरामध्ये तिव्र पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी घटनेच्या निषेधार्थ धरणे आणि मोेर्चे काढले जात आहेत. बीड जिल्ह्यामध्येही या घटनेचा निषेध म्हणून आंदोलन केले जात आहे. आज परळी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला सर्वस्तरातून पाठींबा मिळाला. शहरातील व्यापार्‍यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवले होते. मुस्लिम बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये शेकडो नागरीकांची उपस्थिती होती. यावेळी संघर्ष समितीचे शरीफ भाई, नगरसेवक अजीज, पठाण आयुब, अन्वर, हकीम कुरेशी, जम्मु सेठ, मुफ्ती अशफाक काशमी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या बंदमध्ये शैक्षणिक संस्थाही सहभागी झाल्या होत्या.

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review