ताज्या बातम्या

पोलिसांच ऑल आऊट ऑपरेशन ‘सक्सेस’

पोलिसांच ऑल आऊट ऑपरेशन ‘सक्सेस’
९९९ वाहनांची तपासणी , ११२ हॉटेल लॉजसह ४९ गुन्हेगारी वस्तीची झाडाझडती, १५७ आरोपींना समंस
बीड (रिपोर्टर) :- रात्री ११ ते ५ दरम्यान २८ पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांसह स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन राबवले यादरम्यान  ९९९ वाहनांची तपासणी करत ३५ वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ८,८०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.  तर ११२ हॉटेल लॉजची झाडाझडती  केली. मात्र तेथे काहीच आढळून आले नाही. यावेळी १५७ आरोपींना समंस तर ८० जनांना वारंट बजावण्यात आले.

        पोलिस अधिक्षक जि. श्रीधर, अप्पर पोलिस  अधिक्षक विजय कबाडे, अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडमध्ये  ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या दरम्यान पोलिसांनी  ४९ गुन्हेगार वस्तीची तपासणी केली. माहितीगार गुन्हेगार १०, हिस्ट्री सिटर ८, हॉटेल आणि लॉज१५७, जिल्ह्यातील समंस १५७, एन.बी.डब्ल्यू वारंट २९, बी. डब्ल्यू वारंट  ५१, तर ९९९ वाहनांची तपासणी यावेळी करण्यात आली. त्यापैकी ३५ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ८८०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review