ताज्या बातम्या

पेठ बीड पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अवैध धंदे तेजीत

पेठ बीड पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे
अवैध धंदे तेजीत

बीड (रिपोर्टर) :- पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदा सुरु करण्यासाठी येथील काही कर्मचार्‍यांना हप्पा द्या अन् सर्रास पणे अवैध धंदा सुरु करा असा अलिखीत नियमच कर्मचार्‍यांनी काढला आहे. पोलिसांच्या या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पेठ बीड भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.

          जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला काही हाप्तेखोर पोलिस कर्मचारी जबाबदार आहेत. पेठ बीड पोलिस ठाण्यात काही हाप्तेखोर  पोलिस कर्मचारी आहेत. त्यांच्यामुळे पेठ बीड भागात अनेक ठिकाणी सर्रास पणे विविध अवैध धंदे सुरु आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या हाप्तेखोर पोलिसांना त्यांचा हाप्ता वेळेवर मिळत असल्याने ते या अवैध  धंद्याकडे दुर्लक्ष करत आहे. याकडे वरिष्ठांनी तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review