ताज्या बातम्या

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संशोधन प्रवेश प्रक्रियेस सुरूवात

- इच्छुकांनी पेठ परीक्षा देणे अनिवार्य
- विविध विषयाच्या संशोधनासाठी २३०० जागा
- ऑनलाईन अर्जाचा अंतिम दि.३० जून २०१९ 

      केंद्र सरकारकडून विविध विषयावर संशोधन करण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले जाते. असेच विविध विषयावर संशोधन करू इच्छिणार्‍या पात्रता धारकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बहु प्रतिक्षीत पी.एच.डी प्रवेशासाठी सुरूवात झाली असून पीएचडी करू इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी विद्यापीठ प्रक्रियेत पेठ परीक्षा देणे अनिवार्य आहे. अशा विविध विषयावर संशोधन करण्यासाठी २ हजार ३०० जागा मर्यादीत असून सदरील पेठ परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ३० जूनपर्यंत देण्यात आली आहे. याची संशोधकांनी नोंद घ्यावी. 
       आज आपल्या देशपातळीवर मानवी जीवन प्रगतशील व समृद्ध करण्याकरीता संशोधन हे महत्त्वाचे साधन समजले जाते. तसेच ज्ञान मिळवण्यासाठी व वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग सर्वांच्या डोळ्यासमोर दिसावा यासाठी संशोधनामुळे ज्ञानात नवनवीन गोष्टींचा अर्ंतभाव होत असून ज्ञानात सतत भर पडते. यासाठी केंद्र सरकारकडून विविध विषयावर सखोल संशोधन व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते. तेंव्हा संशोधकांसाठी विविध प्रकारच्या फेलोशीप दिल्या जातात. नुकत्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी संशोधकांसाठी प्रवेश प्रक्रियेस सुरूवात केली आहे. त्याकरीता प्रत्येक उमेदवारासाठी विविध विषयाच्या संशोधनासाठी पेठ परीक्षा देणे अनिवार्य केले असून ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. या परीक्षेसाठी संशोधकाने ुुुwww.unipune.ac.inया संकेतस्थळावर जावून दि.३० जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. 
परीक्षेचे फीस व स्वरूप
विद्यापीठाने विविध विषयाच्या संशोधनासाठी २ हजार ३०० जागेचे नियोजन केले असून खुल्य प्रवर्गासाठी परीक्षा फीस १ हजार रूपये तर मागासप्रवर्गासाठी परीक्षा फीस ७५० रूपये ठेवण्यात आली आहे. तसेच नेटसेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फीसमध्ये सवलत दिली आहे. त्यांना खुल्या प्रवर्गासाठी ८०० रूपये तर मागासप्रवर्गासाठी ६०० रूपये फीस ठेवण्यात आली आहे. युजीसीच्या नियमाप्रमाणे परीक्षा पुणे विद्यापीठात होणार असून सदरील पेठ परीक्षा दोन पेपरची असणार आहे. प्रत्येक पेपरमध्ये ५० प्रश्‍न असे दोन पेपरमध्ये शंभर प्रश्‍न राहतील. पेपर पहिला हा संशोधन पद्धतीवर तर पेपर दुसरा हा आपआपल्या विषयाशी संदर्भात असणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गास ५० टक्के गुण तर मागासप्रवर्गात ४५ टक्के गुण आवश्यक आहे. 
संशोधकांसाठी फेलोशीप सुविधा 
पीएचडी संशोधन करत असतांना पात्र विद्यार्थ्यांना ज्युनिअर रिसर्च फेलोशीप, जेआरडी टाटा फेलोशीप राजीव गांधी फेलोशीप आणि बार्टी व सारथी या संस्थेकडूनही संशोधक विद्यार्थ्यांना आपले संशोधन पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून अशा प्रकारच्या फेलोशीप सुविधा दिल्या जातात. 

अधिक माहिती: pro. sunil jadhav beed

Best Reader's Review