ताज्या बातम्या

घरातील गुप्त धन काढून देते म्हणत भोंदू महिलेने वृध्देस गंडवले

मुलाची दारू सोडवते, तुझ्या घरात वाईट आत्मा आहे, २२ किलो गुप्तधन काढायचं असेल ४० बकरे आणि एक हरीण काप म्हणत वृद्ध महिलेस गंडवले
वृद्धेने विष पिले, पोलिसांनी भोंदू महिलेच्या मुसक्या आवळल्या 
बीड (रिपोर्टर):- तुझ्या घरामध्ये २२ किलो सोनं आहे, वाईट आत्मा आहे, तो आत्मा तुला ते सोनं मिळू देत नाही, त्या आत्मासोबत माझे बोलणे होत आहे. तुला ते धन पाहिजे असेल तर ४० बकरे आणि एका हरीणाचा बळी दे, असं म्हणत भोंदुगिरी करणार्‍या एका महिलेने ६० वर्षीय वृद्धेस सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी अडीच लाख रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यातील कामखेडा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने थेट पोलिसात तक्रार दिल्यानंतर भोंदुगिरी करणारी शेख नाझिया बेगम शेख पाशा (वय ३५) या महिलेच्या पोलिसांनी अखेर मुसक्या बांधल्या. हा सर्व प्रकार फसवणूक झालेल्या महिलेने विष प्राशन केल्यानंतर उघडकीस आाला. 
    बीड तालुक्यातील कामखेडा येथील मन्नाबाई ऊर्फ खालेदा बी सिराज शेख या ६० वर्षीय महिलेचा मुलगा दारू प्यायचा. दारू सोडवित असल्याची माहिती एका महिलेने तेलगाव नाका येथील महिला सोडवित असल्याची दिली. त्यावरून फिर्यादी मन्नाबाई हिने शेख नाझिया बेगम यांच्या घरी जावून आपल्या मुलाची दारू सोडविण्याबाबत विनंती केली. त्यावरून सदरील महिलेला बसून गोल रिंगन करत इतर दोन महिलांना सोबत घेत लिंबू तिला सांगितले की, तुझ्या घरात वाईट आत्म्याचा प्रवेश झाला आहे. मी तुझ्या मुलाची दारू सोडविते त्याचबरोबर तुझ्या घरातील वाईट आत्मा बाहेर काढते. हा प्रकार तब्बल दीड महिना चालला. त्यानंतर काही दिवसांनी नाझियाने मन्ना बी हिस पुन्हा सांगितले की, तुझ्या घरात २२ किलो सोने आहे, ते तुला पाहिजे असेल तर त्यासाठी ४० बकरे व एका हरणाचा बळी द्यावा लागेल. सोबत मला सोने व काही नगदी पैसे आताच द्यावे लागतील. असे म्हणत मन्नाबी हिच्याकडून वेळोवेळी नगदी पैसे उकळले. मात्र मुलाची दारूही सुटली नाही आणि घरातील २२ किलो सोनेही मिळाले नाही मात्र नाझियाचे पैसे उकळणे सुरुच होते. त्यामुळे वैतागलेल्या मन्नाबीने गेल्या दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा अंधविश्‍वासाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नाजिया बेगम या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी नाझिया बेगम हिला ताब्यात घेतले होते. ही कारवाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक लक्ष्मीकांत माने यांनी केली. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review