ताज्या बातम्या

वसाहतीत पोलिसांचे कुटुंबीय भोगतात ‘नरक यातना’

वसाहतीत पोलिसांचे कुटुंबीय भोगतात ‘नरक यातना’

उघडे चेंबर, तुंबलेल्या नाल्या, तुटलेल्या खिडक्या, डुकरांचा उपद्रव, पावसाळ्यात शिरते घरात पाणी, नविन वसाहतीचे भिजत घोंगडे कायम

गणेश जाधव | बीड

गळक्या कौलारू खोल्या... सांडपाण्याची व संडासच्या टाक्यातील पाण्याची विल्हेवाट न लावल्यामुळे घराघरात पसरणारी दुर्गंधी... डुकरांचा उपद्रव... वसाहतीतील दुर्गंधीमुळे दरवाजे लावून जेवण करण्याची वेळ.... उंदीर, घुशिंचा घाणीमुळे होणारा त्रास... एक ना अनेक समस्या आहेत. डागडूजीसाठी आलेला निधी बांधकाम विभागातील अधिकारी स्वत:च्या घश्यात घालत असल्यामुळे बीड शहरातील वसाहतीत पोलिसांचे कुटुंबीय ‘नरक यातना’ भोगत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय गेल्या वर्षाभरापासून नविन वसाहतीचे भिजत घोंगडे कायम आहे.
           बीड शहरात तीन ठिकाणी इंग्रजांच्या काळात बांधलेल्या पोलिस वसाहती आहेत. यामधील तीनही वसाहतीची पूर्ण पडझड झाली आहे. येथील शोचालयाचे चेंबर उघडे पडले आहे. नाल्यांचे बांधकाम नसल्याने रस्त्यावरच चेंबरचे व नालीतील घाण पाणी येते. स्लॅपचे प्लास्टर जेवतांना ताटात पडत आहे. खिडक्या तुटलेल्याने डुकर, कुत्रे घरात येवून नासाडी करतात. भटकंती करणार्‍यांचे पाल तरी एकवेळी सुरक्षीत आहेत. ते चांगली जागा शोधून पाल ठोकूण राहतात. मात्र या परिसरात अत्यंत घाण असतांनाही पोलिसांचे शेकडो कुटुंबीय येथे राहत आहेत. वसाहतीची वेळोवेळी डागडूजी केली जात नाही. पोलिस कल्याण निधीतून डागडूजीसाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो मात्र वसाहतीतील समस्या आहेत तशाच आहे. गेल्या वर्षी पोलिस मुख्यालयातील काही घरांची केवळ रंगरंगोटी केली होती. तर जिल्हारुग्णालयाच्या पाठीमागील वसाहतीमध्ये कसल्याही प्रकारची डागडूजी केली नाही. गेल्या वर्षी पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या पाठीमागील वसाहतीचे काम सुरु करण्यात येणार आहे. म्हणून येथील सर्व पोलिस कुटुंबीयांना जिल्हारुग्णालयाच्या पाठीमागील इमारतीमध्ये स्थलांतर करावे लागले. मात्र एक वर्ष लोटले तरी पोलिसांच्या घराचा प्रश्‍न मिटला नाही. नविन घर तर सोडाच मात्र आहे त्या घराची डागडूजीही नसल्यामुळे पोलिस कुटुंबीय येथे ‘नरक यातना’ भोगत आहे.

कोट...
पोलिस कर्मचार्‍यांसाठी २४१ घरांना मंजूरी मिळाली आहे. त्याचे भुमिपूजन येत्या महिन्यात होणार आहे. हे कॉर्टर बालेपीर भागातील मुख्यालय परिसरात बनविण्यात येणार आहेत.
जी. श्रीधर
पोलिस अधिक्षक, बीड

चौकट...
बंगल्यात राहणार्‍या अधिकार्‍यांना पोलिसांच्या समस्या कळेना
विविध समस्यांनी ग्रासलेल्या वसाहतीत पोलिसांचे कुटुंबीय राहत आहेत. काहींनी केव्हाच वसाहती सोडल्या मात्र, काही कुटुंबीय घरात मुलीबाळी आहेत. त्यांना येथे संरक्षण मिळत असल्यामुळेच येथे राहत आहेत. बंगल्यात राहणार्‍या अधिकार्‍यांना पोलिसांच्या समस्या कळत नहीत का? की जानिवपूर्वक दुर्लक्ष होते असा सवाल पोलिस पत्नी विचारत आहेत.
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review