ताज्या बातम्या

गेवराई तालुक्यात पाण्याने घेतला चार वर्षीय मुलीचा बळी

गेवराई तालुक्यात पाण्याने घेतला चार वर्षीय मुलीचा बळी
गाडीचे चाक अंगावरुन गेल्याने मुलीचा मृत्यू
गेवराई (रिपोर्टर)ः- जिल्ह्यामध्ये भिषण पाण्याची टंचाई आहे. गेवराई तालुक्यातील अंबुनाईक तांडा येथील शेतकरी बैलगाडीत पाणी आणण्यासाठी जात होते. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी व दोन मुले होते. यातील एक चारवर्षीय मुलगी गाडीतून खाली पडल्याने तिच्या अंगावरून चाक गेले. त्यामध्ये तिचा दुर्देवी मृत्यु झाला. 
खांडवी येथील अंबुनाईक तांड्यावर पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई आहे. आजसकाळी पापासाहेब आडे हे बैलगाडीद्वारे पाणी आणण्यासाठी जात होते. बैलगाडीत त्यांची पत्नी व दोन मुले होते. यावेळी चार वर्षीय मुलगी रागिनी गाडीतून खाली पडल्याने तिच्या अंगावरुन चाक गेल्याने ति गंभीर रित्या जखमी होवू मरण पावली. या घटनेने अंबुनाईक तांडा येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review