ताज्या बातम्या

गणेश सावंत, राजाभाऊ माने, सय्यद शहेंशाह,  दीपक घुमरे  पुरस्काराने सन्मानित होणार 

अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पुरस्कार जाहीर
गणेश सावंत, राजाभाऊ माने, सय्यद शहेंशाह, 
दीपक घुमरे  पुरस्काराने सन्मानित होणार 
बीड (रिपोर्टर):- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा केली असून सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे राजाभाऊ माने यांना आदर्श सामाजिक पुरस्कार तर पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार तर पोलिस खात्यात उत्कृष्ट
 काम करणारे सय्यद शहेंशाह वाजेद यांना आदर्श पोलिस पुरस्कार आणि दीपक घुमरे यांना आदर्श संस्था चालक पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण २३ जून रोजी हॉटेल निलकमल येथे एका कार्यक्रमात होत असून या वेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष विनोद आप्पा इंगोले, जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे पाटील यांनी दिली. 
    या देशाच्या उभारणीत आणि जडण-घडणीत ज्यांचे मोलाचे योगदान आहे, असे विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक आणि भ्रष्टाचार निर्मूलनाच्या पवित्र कार्यात जे हिरारीने सहभागी होणार आहेत, असे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कार्यकर्ते व भावी पदाधिकारी तसेच भविष्यात जे देशाचे भवितव्य ठरवणार आहेत, असे विद्यार्थी या सर्वांचा त्रिवेणी संगम करत आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचा गौरव व सन्मान करण्यासाठी तसेच भविष्यातील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मराठवाडा विभागाची वाटचाल, कृती आराखडा ठरवण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, बीड जिल्हा तर्फे दिनांक २३ जून २०१९, वार - रविवार रोजी नगर रोडवरील हॉटेल निलकमल येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री. विनोद आप्पा इंगोले पाटील व  जिल्हाध्यक्ष मा श्री प्रकाशरावजी काळे पाटील यांनी भव्य पुरस्कार वितरण, विद्यार्थी गुणगौरव व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. सदरील कार्यक्रमास अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. प्रदीप पाटील खंडापूरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या हस्ते अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. राजाभाऊ माने यांना सामाजिक क्षेत्रातील तसेच भ्रष्टाचार निर्मूलनातील भरीव योगदानासाठी, तसेच पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी सायं दै. बीड रिपोर्टर चे कार्यकारी संपादक मा. श्री. गणेश सावंत पाटील, पोलीस खात्यातील योगदानासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक  मा. श्री. सय्यद शहेनशहा वाजेद, तसेच उत्कृष्ट संस्थाचालक म्हणून मा. श्री. दिपक घुमरे आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम झाल्यावर अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होणार आहे. तरी सदरील सोहळ्यास बहुसंख्य गुणज्ञानी व देशभक्त नागरिकांनी उपस्थित रहावे अशी कळकळीची विनंती कार्यक्रमाचे आयोजक अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष विनोद आप्पा इंगोले पाटील व जिल्हाध्यक्ष प्रकाशरावजी काळे पाटील यांनी केले आहे
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review