ताज्या बातम्या

हार तुरे न स्वीकारता ना जयदत्त क्षीरसागर करणार बीड जिल्हा दौरा

हार तुरे न स्वीकारता ना जयदत्त क्षीरसागर करणार बीड जिल्हा दौरा
बीड (रिपोर्टर):- कठीण प्रसंगात ज्या जनतेने भक्कम साथ दिली त्यांच्याच आशीर्वादाने पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले या पदाचा दुष्काळी भाग म्हणून बीड जिल्यातील प्रश्न सोडवून घेण्याच्या दृष्टीने राज्याचे रो ह यो व फलोत्पादन मंत्री ना जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्हा दौर्‍यावर येत असून यावेळी हार तुरे किंवा स्वागत समारंभ न करता ते दौरा करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे.
राज्याचे रो ह यो आणि फलोत्पादन मंत्री मा ना जयदत्त क्षीरसागर हे शनिवार दि २२ रोजी बीड जिल्हा दौर्‍यावर असून दि २२ व दि २३ दोन दिवस विविध कार्यक्रम व आढावा बैठक घेतील,ज्या जनतेने कठीण प्रसंगात भक्कम साथ दिली,त्यांचे प्रश्न जाणून घेऊन मिळालेल्या संधीचा उपयोग जनतेसाठी करणार आहेत,बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता हा दौरा केवळ दुष्काळ निवारणार्थ असून कार्यकर्त्यांनी कुठलेही हार तुरे किंवा स्वागत समारंभ ठेऊ नयेत,मंत्री पदावर ना जयदत्त क्षीरसागर हे चौथ्यांदा काम करत आहेत,त्यामुळे कुणीही या दौर्‍यात सत्कार वगरे करू नये,त्याऐवजी नागरिकांसाठी पाण्याची टाकी,व दुष्काळी मदत करून सामाजिक उपक्रम राबवावेत,अनाठायी खर्च करण्यापेक्षा लोकोपयोगी खर्च करावाअसे आवाहन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review