ताज्या बातम्या

महेबूब शेख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक

महेबूब शेख राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे स्टार प्रचारक
बीड (रिपोर्टर):- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी बीडचे शेख महेबूब यांची नियुक्ती झाल्यानंतर काल त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जबरदस्त आंदोलन करत मेहताचा राजीनामा मागितला, पाठोपाठ आज पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महेबूब शेख यांना स्थान देण्यात आलं असून राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून ते राज्यभर महानगर पालिकेतील रिक्त पदाच्या पोट निवडणुकीत प्रचार करणार आहेत. 
  आगामी काही दिवसात राज्यातील महानगरपालिकेच्या रिक्त पदाच्या पोट निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारक म्हणून एक यादी निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. या यादीत २० स्टार प्रचारक आहेत. यामध्ये जयंत पाटील, अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, राम नाईक, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, उदयनराजे यांच्यासह शेख महेबूब यांचे नाव आहे. राष्ट्रवादीने युवकांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात शेख महेबूब यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आणि काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘वर्षा‘ बंगल्यासमोर जबरदस्त आंदोलन करत प्रकाश मेहता यांचा राजीनामा मागितला. या वेळी त्यांना अटकही झाली. आज पक्षाने पुन्हा महेबूब यांना मोठी संधी दिली असून ते पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत येऊन बसले आहेत. 

अधिक माहिती: रिपोर्टर

Best Reader's Review