बीडसांगवी मध्ये कामगाराचा मृत्यू

बीडसांगवी मध्ये कामगाराचा मृत्यू
बीड (रिपोर्टर)ः- बीडसांगवी येथे किराणा दुकानामध्ये काम करत असतांना अचानक चक्कर आल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आज रात्री घडली.
    शिवालाल पारीख (वय ४० वर्षे, रा. बीडसांगवी ता.आष्टी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. हा कामगार दिपक कासपा यांच्या किराणा दुकानामध्ये गेल्या अनेक दिवसापासून काम करत होते. रात्री अचानक त्यांना काम करतांना चक्कर आली. त्यांना तत्काळ उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. योवळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यामध्ये अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती: रिपोर्टर

Best Reader's Review