ताज्या बातम्या

सोयाबीनचा विमा न दिल्यास १७ जूनला  कार्यालयाला कुलूप ठोकणार-गंगाभीषण थावरे

सोयाबीनचा विमा न दिल्यास १७ जूनला 
कार्यालयाला कुलूप ठोकणार-गंगाभीषण थावरे
बीड (रिपोर्टर):- विमा कंपनीने सोयाबीनला विमा दिला नसल्याने शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात आपण कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. विमा देण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. १७ जूनपर्यंत विमा न दिल्यास पुणे येथील आरिएंट कंपनीला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा गंगाभिषण थावरे यांनी दिला. खरीप पिकाचा नुकताच विमा जाहीर करण्यात आला असून ईतर सर्व पीकांना विमा देण्यात आला. मात्र सोयाबीनला विमा दिला गेला नाही. बीड जिल्ह्यात (पान चारवर) 
मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झालेला होता. पावसाअभावी सोयाबीनचे नुकसान झाले. असे असतांना ओरिएंट कंपनीने सोयाबीनला विमा दिला नसल्याने शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. काल पुणे येथील कार्यालयात जावून अधिकार्‍यांना जाब विचारण्यात आला. विमा देण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. १७ जूनपर्यंत सोयाबीनचा विमा न दिल्यास विमा कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review