स्कॉर्पिओच्या धडकेने दोघे ठार 

स्कॉर्पिओच्या धडकेने दोघे ठार 
चौसाळा रोडवर घडली रात्री घटना 
नेकनूर/चौसाळा (रिपोर्टर):-भरधाव वेगात निघालेल्या स्कॉर्पिओने मोटारसायकलला धडक दिल्याने यामध्ये दोघे जण ठार झाल्याची घटना रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान चौसाळ्यापासून काही अंतरावर घडली. घटना घडल्यानंतर महामार्ग पोलिस आणि चौसाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आज सकाळी मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  पारगावहून बीडकडे निघालेली स्कॉर्पिओ (क्र. एम.एच. २३ आर. ४४६२) ने बीडहून चौसाळ्याकडे निघालेली मोटारसायकल (क्र. एम.एच. २३ आर. ५४०) ला जोराची धडक दिली. यामध्ये सतीश सारंग मोरे (वय २७, रा. चांदणी) व धनंजय शिवाजी कोल्हे (वय २५, रा. चांदेगाव) हे दोघे जण ठार झाले. मयताचे शवविच्छेदन सकाळी चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केेंद्रामध्ये करण्यात आले. घटनेची माहिती हायवे पोलिसांना झाल्यानंतर पीएसआय वाघमारे नेकनूर ठाण्याचे नवले, जाधवर, दुधाळ, शेख अलताफ, सोनवणे, वनवे यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात स्कॉर्पिओमधील काही जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती चौसाळा चौकीचे ए.एम.निसे, डोंगरे, जायभाये, शेंडगे, गर्जे, चव्हाण यांना झाल्यानंतर हेही घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी स्कॉर्पिओ चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
   पाण्याने घेतला महिलेचा बळी
 बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाणीटंचाई तीव्र असून अनेक गावचे नागरीक दूरवरून बैलगाडी, मोटारसायकल व इतर वाहनाने पाणी आणतात. तालुक्यातील गुंजाळा येथील अनुरथ घुगे हे मोटारसायकलवर कॅन बांधून पाणी घेऊन येत होते. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी मिनाक्षी घुगे याही होत्या. पाण्याचे कॅन गाडीवर असल्याने गाडी स्लिप झाली आणि यात मिनाक्षी घुगे यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. 
 

अधिक माहिती: रिपोर्टर

Best Reader's Review