दुचाकीस्वाराने बस वाहकाच्या श्रीमुखात भडकावली 

दुचाकीस्वाराने बस वाहकाच्या श्रीमुखात भडकावली 
रस्त्यावर बस आडव्यालावून चालक, वाहकांचा रास्तारोको

माजलगाव,   ता. १८ - आपली गाडी भरायच्या अगोदर बस निघाल्याने आपल्याला प्रवासी मिळाले नाही. यामुळे घायाळ नामक अवैध वाहनचालकांने दुचाकी आडवी लावून बसच्या वाहक, चालकाला मारहाण केली. यामुळे डेपोतील वाहक, चालकांनी एकत्र येत शिवाजी चौकातील रस्त्यावर बस आडव्या लावून दीड तासापासून रास्तारोको आंदोलन सुरू केली आहे.
माजलगाव बसस्थानाकातून सकाळी आठ वाजता आनंदगाव गाडी बाहेर पडत असताना रस्त्यात घायाळ नामक व्यक्तीने त्याची दुचाकी आडवी लावली होती. हॉर्न वाजावूनही तो बाजूला घेत नसल्याने आनंदगाव बस चे वाहक सुमंत वाघ गाडीखाली उतरून दुचाकीस्वाराला गाडी बाजूला घेण्याची विनंती करीत असताना त्याने वाहकाच्या श्रीमुखात भडकावली, बसचे चालक नवनाथ मुंडे हे तात्काळ खाली उतरून गेले असता त्यांचेही कपडे फाडून धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे डेपोतील सर्वच वाहक, चालक एकत्र येऊन त्यांनी शिवाजी चौकात बस रस्त्यावर लावून रास्तारोको सुरू केला आहे. हा प्रकार एक, दिड तासापासून सुरू असल्याने मोठ्याप्रमाणात वाहतूक खोळंबली असून, दुचाकीस्वारावर कारवाई, अटक केल्याशिवाय गाड्या काढणार नसल्याचा पवित्रा वाहक, चालकांनी घेतला आहे.

अधिक माहिती: रिपोर्टर

Best Reader's Review