ताज्या बातम्या

दारुच्या नशेत स्वत: घर पेटवले  पत्नीने दिली पतीविरुद्ध फिर्याद

दारुच्या नशेत स्वत: घर पेटवले 
पत्नीने दिली पतीविरुद्ध फिर्याद
बीड (रिपोर्टर):- धारूर तालुक्यातील जहागीरमोहा येथे दारुच्या नशेत मद्यपीने पत्नीला मारहाण करत स्वत:चे घर पेटवून दिले. यामध्ये एक लाखाचे नुकसान झाले असून पत्नीने पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्ध घर पेटवून दिल्याबाबत फिर्याद दिली आहे. 
श्रीराम धर्मराज दराडे हे काल दुपारी दारुच्या नशेत घरी आल्यानंतर त्यांनी पत्नीशी वाद केला. घरामध्ये आडीत आंबे पिकवण्यासाठी घातले होते. या वेळी श्रीराम दराडे याने आडीतील गवताला आग लावली. त्यामुळे अख्ख्या घराने पेट घेतला. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. याबाबत श्रीराम दराडे याची पत्नी ठकुबाई दराडे हिने बर्दापूर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती: रिपोर्टर

Best Reader's Review