कॉंग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ घटले

कॉंग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ घटले
विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता
बीड (रिपोर्टर):- लोकसभा निवडणूकीमध्ये राज्याच्या राजकारणात प्रचंड घडामोडी झाल्या. यात कॉंग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते यांच्या मुलाने भाजपाकडून निवडणूक लढवल्याने विखे पेचात पडले. आणि शेवटी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. विखेसह अन्य तीन आमदार कॉंग्रेसपासून बाजुला हटल्याने कॉंग्रेसचे संख्याबळ ४२ वरून ३८ वर आले. त्यामुळे कॉंग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पद मिळणे अवघड झाले. हे पद राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीकडे कॉंग्रेसपेक्षा जास्तीचे संख्याबळ आहे. 
लोकसभा निवडणूकीमध्ये राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. पक्षावर नाराज असलेल्या काहींनी इतर पक्षाचे दार ठोठावले. त्यामध्ये प्रामुख्याने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर चांगलाच पेच निर्माण झाला होता. विखे यांच्या मुलाला कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी होती. मात्र ती जागा राष्ट्रवादीकडे असल्याने कॉंग्रेसकडे येवू शकली नाही. शेवटी सुजय विखे पाटील भाजपाकडून उमेदवारी मिळवली. त्यामुळे विखे पाटील यांनी आपल्या विधान सभेच्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. त्यातच सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हेही पक्षावर नाराज असल्याने त्यांनी ते पक्षापासून दुर हटलो. नितेश राणे आणि कालीदास कोळंबकर हे दोन आमदारही कॉंग्रेसशी दूर झाल्यामुळे कॉंग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ ४२ वरून ३८ वर आले. तर राष्ट्रवादीचे एक संख्याबळ कमी झाले. राष्ट्रवादीच्या आमदाराची संख्या ४० असून विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक असल्याने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पदही राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता वर्तवली जावू लागली. 
प्रदेशाध्यक्षपदी थोरात यांची निवड होण्याची शक्यता
लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसमध्ये मोठी पडझड झाली. लोकसभेत कॉंग्रेसचे किती उमेदवार निवडूण येतात याबाबत तर्क वितर्क होत आहे. सध्या प्रदेश अध्यक्षपद हे अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. त्यांच्याकडचे पद काढून ते नगर येथील बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. 

अधिक माहिती: रिपोर्टर

Best Reader's Review