शासकीय धान्याच्या गोदामाला आग

शासकीय धान्याच्या गोदामाला आग
परळी (रिपोर्टर):- शासकीय धान्याच्या गोदामाला अचानक आग लागल्याने सदरील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केल्याने वेळीच आग आटोक्यात आली. यामुळे होणारे मोठे नुकसान टळले. 
   परळीपासून ७ कि.मी. अंतरावर धारावती तांडा येथे शासकीय धान्याचे गोदाम आहे. या गोदामात शेकडो पोते धान्य असून आज सकाळी गोदामाला आग लागली. सदरील आग विझवण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वेळीच आग आटोक्यात आल्याने होणारे मोठे नुकसान टळले आहे. 

अधिक माहिती: रिपोर्टर

Best Reader's Review