ताज्या बातम्या

परळीत पाणी भरण्याच्या धडपडीत शॉक लागल्याने एकाचा मृत्यू! 


परळी (रिपोर्टर):-पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून पाणी भरण्याच्या धडपडीत लोकांना जीव गमवावा लागत आहे.  हौदात उतरून पाणी भरत असताना एका व्यक्तीचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८.१५ वा.च्या दरम्यान घडली. 
    नगर परिषदेकडून  परळीत दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची साठवणूक करण्याची नागरिकांकडून धडपड करण्यात येत आहे. यातूनच हौदात मोटार लावून पाणी भरताना वीजप्रवाहाचा शॉक लागून संजय राजाभाऊ विडेकर (वय ४८ ) रा. हालगे गल्ली परळी  या व्यक्तीला प्राण गमवावा लागला.  विशेष म्हणजे परळीचे नगराध्यक्षा सौ.सरोजिनीताई हालगे यांच्या प्रभागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. मयत हा पानटपरी चालवून उदरनिर्वाह करत होता.  पाणी टंचाईच्या परिस्थितीने या व्यक्तीचा बळी घेतला असून हालगे गल्ली भागातील नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review