उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या गाडीला अपघात


पाडळसिंगी (रिपोर्टर):- सकाळच्या वेळी साखर झोपेत असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांच्या गाडीच्या चालकाने उभ्या असलेल्या टिप्परला धडक दिल्याने शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. 
  उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक हे मुंबईहून बैठक संपवून बीडकडे येत असताना पाडळसिंगीजवळ सकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या गाडी (क्र.एम.एच. २३ - १४४४) च्या चालकाने समोर उभा असलेल्या टिप्परला धडक दिली. मात्र या अपघातात सुदैवाने काहीही नुकसान झाले नाही. गाडीचे मात्र नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे याच गाडीने यापूर्वीही तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. निला यांच्यासोबत अनेक उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना पाडळसिंगी येथेच या गाडीने पेट घेतला. याही वेळी सुदैवाने अधिकारी बालबाल बचावले. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे हे याच रस्त्याने जात असताना त्यांचाही किरकोळ अपघात झाला होता. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review