पाटोदा तालुक्यात नरेगाचे २९६ कामे मंजूर मजूराच्या हातानेच कामे करा 


पाटोदा (रिपोर्टर):- दुष्काळी परिस्थितीने मेटाकुटीला आलेल्या पाटोदा तालुक्यातील जनतेसाठी राज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तब्बल २९६ कामे मंजूर केली असून यामध्ये बुडीत क्षेत्रातील सार्वजनिक विहिरी बांधबंधिस्त सलग समतर चर, सीसीटी, नाला सरळीकरण, रोपवाटिका यासह अन्य कामांचा समावेश आहे. हे सर्व कामे मजुरामार्फत केली जाणार आहेत अशी माहिती पाटोदा येथील बिडीओ राजेंद्र मोराळे यांनी दिली. 
बीड जिल्ह्यात दुष्काळाने हाहाकार माजून सोडला आहे. चारा पाण्याचा प्रश्‍न जेवढा आव असून उभा तेवढाच लोकांना हाताला कामही नाही. त्यामुळे वाडी, वस्ती, तांड्यासह गावागावातील लोक स्थलांतर करत आहेत. दुष्काळाची भयावहता आष्टी, पाटोदा तालुक्यातही मोेठ्या प्रमाणावर पहावयास मिळते. राज्य शासनाने पाटोदा तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामांना मंजूरी दिली आहे. यामध्ये ४९ बुडीत क्षेत्रातील सार्वजनिक विहिरी, ३४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी वैयक्तीक सिंचन विहिरी, ३० जलसिंचन वैयक्तीक विहिरी, ३२ बांधबंधिस्त, ४ सलग समतर चर, ५ सीसीटी, ३० गाळ काढणे, ४ एलबीएस, ३ नाला सरळीकरण, २० शेततळे, १ राजीव गांधी भवन, १ रस्ता, स्मशानभुमी, दोन जलशोषक चर, ५ नाला खोलीकरण, २ रोपवाटिका असे एकूण २२३ नरेगाची कामे तालुक्यात होणार आहेत. तर या योजने अंतर्गतच सलग समतर चर ९, रोपवाटिका १, रोपवन २३, एलबीएस ४, बांधबंधिस्त २७, रोपवाटिका ७, रोपवाटिका २ असे एकूण ७३ म्हणजे तब्बल २९६ कामे मंजूर झाले असून हे सर्व कामे, मजूरांकडुन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. अशी माहिती बीडीओ राजेंद्र मोराळे यांनी दिली. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review