कासारी बोडखा येथे वृद्ध ऊसतोड महिलेस बेदम मारहाण


सात जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर):- कासारी बोडखा (ता.धारूर) येथे एका ऊसतोड मजूर कुटूंबाने मुकादमाकडून उचल घेतली होती आणि या उचलीच्या देवाण-घेवणीतून त्या महिलेकडे दहा हजार रूपये फिरल्याने ते पैसे परत देण्याच्या मागणी मुकादमाने केली मात्र पैसे न दिल्याने महिलेला मुकादमाने बेदम मारहाण करून डोळ्यात चटणी टाकून तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी महिलेला स्वाराती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.        या प्रकरणी मुकादमासह सात जणांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
    कासारी बोडखा या गावातील मुकदाम बडे यांच्याकडे आधिकाबाई उघडे आपल्या कुटुंबासह दरवर्षी ऊसतोडणीसाठी जातात. याही वर्षी त्या गेल्या होत्या. यासाठी त्यांनी उचलही घेतली होती. मात्र हंगाम संपल्यानंतर आधिकाबाईंकडे १० हजार रुपये फिरत होते. हे पैसे तात्काळ दे म्हणून मुकादमाने तगादा लावला. मात्र हे पैसे देण्यास आधिकाबाईने असमर्थता दाखवल्यामुळे वाद निर्माण झाला. या प्रकरणी गेल्या महिनाभरापूर्वी त्या मुकादमाच्या विरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती. तेंव्हा त्या मुकादमाने तु तक्रार मागे घे असे म्हणत काल त्या महिलेला बेदम मारहाण केले. तिचे हातपाय बांधले, तिच्या डोळ्यात चटणी टाकली व तिच्या मुलालाही फाशी देण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्या महिलाला गावातील काही ग्रामस्थांनी तात्काळ स्वराती रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या ती महिला अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या प्रकरणी अधिकाबाई अंगद उघडे वय ६० वर्षे धंदा ऊसतोड मजूरी यांच्या फिर्यादीवरून आरोपी पांडुरंग बडे, मधुकर बडे, सुशिला बडे, रामप्रभु बडे, भागवत बडे, सत्वशिला बडे तसेच पांडुरंग बडे यांची सून असे एकूण सात जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा कलम १४३,१४७, १४९, ३२४, ५०४, ५०६, ३ (२) व्हीए अ.ज.क्र. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक श्रीकांत डिसले करत आहेत. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review