जिल्हा रूग्णालय परिसरात सामान्य नागरिकांना गंडा घालणार्‍यांची टोळी सक्रीय


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्हा रूग्णालय परिसरामध्ये ग्रामिण भागातून आलेल्या सामान्य नागरिकांना गंडा घालणार्‍यांची टोळी सक्रीय झाली असून गेल्या दोन-तीन दिवसामध्ये बर्‍याच लोकांना पैशाच्या स्वरूपात गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. 
जिल्हा रूग्णालयामध्ये जिल्हाभरातून अत्यंत गोरगरीब कुटुंबातील रूग्ण आपल्या नातेवाईकांसोबत रूग्णालयात उपचारासाठी आलेले असतात. तेंव्हा ही टोळी अत्यंत सामान्य अशा लोकांना हेरून त्यांना काही स्वरूपात थोडीशी ओळख दाखवून त्यांना भुरळ घातली जाते. व चहा पिण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून खिशात असणारी सर्व रक्कम हडप करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामध्ये श्रीरंग रघुनाथ भोसले (वय ६०) हा वृद्ध आपल्या मुलीच्या डिलीव्हरीसाठी रूग्णालयात आला होता. तेंव्हा त्याच्या भोळेपणाचा फायदा घेवून या टोळीने त्याच्याकडून गावाकडची काही हकीकत सांगून त्याला भुरळ घातली आणि त्याच्याकडून २० हजार रूपये काढून घेतले. तसेच केशव विठ्ठल लोणके याच्याकडूनही ३ हजार रूपये काढून घेतले. अजून काही रूग्णांच्या नातेवाईकांचीही पैसे गायब झाल्याची चर्चा सुरू आहे. तेंव्हा अशीही टोळी सक्रीय झाली असून तिचा तात्काळ बंदोबस्त करण्याची गरज आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review