अवैध कोळशाचा टेम्पो पकडला शिवाजीनगर पोलीसांची कामगिरी;

कारवाईसाठी वन विभागाच्या स्वाधीन
बीड (रिपोर्टर):- शहरामध्ये कोळसा घेवून जाणारा टेम्पो आल्याची माहिती गुप्त पद्धतीने पोलीसांना मिळाली. तेंव्हा शिवाजी नगर पोलीसांनी सापळा रचून रात्री त्या टेम्पोसह चालकाला ताब्यात घेतले. आणि पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. 
अवैध व बेकायदेशीररित्या कोळसा घेवून आलेला टेम्पो बीड शहरामध्ये दाखल झाला आहे व तो इतर ठिकाणी कोळसा घेवून जात आहे. अशी माहिती गुप्तचरांमार्फत पोलीसांना मिळाली. एम.एच.१६ सीसी ३९७८ हा सदरील टेम्पो पोलीसांनी जालना रोड याठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता कोळसा आढळून आला. चौकशी दरम्यान हा टेम्पो वाहन चालक संजय प्रेमा राठोड वय ४२ वर्षे रा.ढवळपुर ता.पारनेरर जि.अहमदनगर, नागेश रतन दोरमिसे वय २२ वर्षे रा.लोणापुरी जि.बीड असे त्या इसमांचे नाव आहेत. सदरील टेम्पो ताब्यात घेवून तो टेम्पो चालक आणि मालक यांच्यावर कारवाईसाठी वन विभाग जिल्हा कार्यालय बीड यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरील कामगिरी शिवाजी नगर ठाण्याचे गायकवाड, उबाळे, वायभट तसेच एस.पी.चे विशेष पथक यांच्या समन्वयाने करण्यात आली.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review