ताज्या बातम्या

आयआरबीचा गलथान कारभार नागरिकांच्या मुळावर

आयआरबीचा गलथान कारभार नागरिकांच्या मुळावर
रस्त्याचे श्रेय घेण्यासाळी पाडळसिंगीजवळ सर्विस रोड न करताच उड्डानपूल वाहतूकीसाठी सुरु
बीड (रिपोर्टर) :- राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आचारसहिता लागण्यापूर्वी पाडळसिंगी येथे सर्विस रोड न करताच उड्डानपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. याला एक महिना लोटला तरी पाडळसिंगी येथे सर्विस रोड न झाल्याने अनेक अपघात होत आहेत.
धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र काही ठिकाणी आयआरबीच्या गलथान कारभाराचे बळी नागरीक ठरत आहेत. या कामाचे श्रेय घेण्यासाठी लोकसभेची आचारसहिता लागण्यापूर्वीच उद्घाटनाचा घाट भाजपाने अर्धवट काम असतांनाही घातला. गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे धुळे- सोलापुर रस्त्यावला मुंबई ते नांदेड रस्ता मिळत आहे. या ठिकाणी उड्डापूल करण्यात आला आहे. मात्र तेथे सर्विस रस्ता न करताच उद्घाटन करुन उड्डानपूल वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला. गेवराईकडून आलेल्या वाहनचालकांना मादळमोहीकडे जातांना उड्‌डानपुलावरुन टोलनाक्याकडे यावे लागते. त्यानंतर वळका घेवून मादळमोहिकडे जावे लागते. तर काही वाहनचालक विरुध्द दिशेने वाहन चालवत असल्याने अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे आयआरबीने तत्काळ पाडळसिंगी येथील सर्विस रोडचे काम सुरु करावे अशी मागणी होत आहे.

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review