ताज्या बातम्या

भाई थावरेंचा शेतकरी पुत्रास पाठींबा भाजपा सरकार शेतकरी विरोधी-भाई थावरे

भाई थावरेंचा शेतकरी पुत्रास पाठींबा
भाजपा सरकार शेतकरी विरोधी-भाई थावरे
माजलगांव (रिपोर्टर):- गेल्या पाच वर्षामध्ये भाजपा सरकारने नुसत्या घोषणा करून जनतेची दिशाभूल केली. शेतकरी विरोधी धोरणे भाजपाने राबवले त्यामुळे शेतकर्‍यांना विविध अडचणींचा तोंड तर द्यावे लागलेच पण भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असून या सरकारला घरी बसवण्यासाठी आपण शेतकरी पुत्र असलेल्या बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठींबा देत असल्याचे शेतकर्‍यांचे नेते गंगाभीषण थावरे यांनी म्हटले आहे.
गंगाभीषण थावरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षामध्ये भाजपा सरकारने जनतेसह शेतकर्‍यांची दिशाभुल केली. शेतकर्‍यांच्या मालाला भाव दिला नाही. पीक कर्जा बाबतचे धोरण चुकीचे आहे. पीक कर्जाचा शेतकर्‍यांना लाभ मिळाला नाही. कर्जमाफी केली तीही अर्धवट. यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत अधिकच भर पडल्याने शेतकरी विरोधी धोरणं राबवणार्‍या भाजपा सरकारला घरी बसवण्याची नितांत गरज असून बीडमध्ये परिवर्तन व्हायला हवे. शेतकरी पुत्र असलेल्या राष्ट्रवादी, कॉंग्रेस  व आघाडीच्या उमेदवाराला आपण पाठींबा देत असून बजरंग सोनवणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन गंगाभीषण थावरे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला अनेकांची उपस्थिती होती. 

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review