ताज्या बातम्या

एकजुटीची ताकद दाखवायची असेल तर डॉ प्रीतम मुंडे यांना मताधिक्य द्या -आ जयदत्त क्षीरसागर

एकजुटीची ताकद दाखवायची असेल तर डॉ प्रीतम मुंडे यांना मताधिक्य द्या -आ जयदत्त क्षीरसागर
बीड दि 13(प्रतिनिधी)
मराठवाडा आणि बीड जिल्ह्यात दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असतो मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढावा यासाठी आम्ही सातत्याने मागण्या करत आलो परंतु आमच्या सरकारने याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही मराठवाड्यातील ही भयानक परिस्थिती बदलली पाहिजे भविष्यातला मराठवाडा जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा मन खिन्न होऊन जाते सरकारचा पैसा हा मराठवाड्यासाठी नव्हता का ?असा सवाल करत एकजुटीची ताकद दाखवायची असेल तर डॉ प्रीतम मुंडे यांना मताधिक्य द्या असे आवाहन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे
शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आयोजित केलेल्या जवळा येथे महायुतीचे उमेदवार डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या आणि आज गर्दी असलेल्या जाहीर सभेत आमदार जयदत्त क्षीरसागर बोलत होते यावेळी माजी आमदार बदामराव पंडित जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, विलास बडगे, जगदीश काळे, दिनकर कदम ,अरुण डाके,युध्दाजित पंडित, बप्पासाहेब घुगे, परमेश्वर सातपुते ,गोरख शिंगण, रतन गुजर, सतीश पाटील, मनोज पाटील, पंढरीनाथ लगड, गणपत डोईफोडे, दिलीप गोरे, राजेंद्र मस्के, ऍड राजेंद्र राऊत ,नवनाथअण्णा शिराळे सुनील शिंदे, भारत शिंदे, मधुकर डोईफोडे ,राम शिंदे, अरुण बोंगाणे, कल्याण खांडे,अजिंक्य पांडव, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी आमदार बदामराव पंडित म्हणाले की जयदत्त आण्णा जिकडे असतात तिकडे विजय नक्कीच असतो स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर बीड जिल्ह्याला ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आणि अभ्यासू वृत्तीचे नेते जयदत्तआण्णा असून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देऊन विजयी करा यावेळी बोलताना आ जयदत्त क्षिरसागर यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य करत त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारवर ताशेरे ओढले ते म्हणाले की, मी तेरा वर्षे या सरकारमध्ये होतो मराठवाड्याची अवस्था पाहून मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही सातत्याने मागणी करत राहिलो बीड जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन अनेक मोठमोठे सिंचनाचे प्रकल्प व्हावेत यासाठी देखील मागण्या केल्या परंतु सरकार कडून फारसे गांभीर्याने याकडे पाहिले जात नव्हते मराठवाड्यातील ही भयानक परिस्थिती बदलली पाहिजे भविष्यातला मराठवाडा जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा मन खिन्न होते सरकारचा पैसा हा मराठवाड्यासाठी नव्हता का ? असा सवाल करत सरकारकडून मिळणार नाही ही सापत्न वागणूक लक्षात येत होती अशा अस्‍वस्‍थ परिस्थितीमध्ये राहणे देखील कठीण झाले होते अखेर जो मराठवाड्याचा आणि जिल्ह्याचा विचार करेल त्यालाच समर्थन देण्याचा संकल्प आम्ही केला आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपण मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढून घेऊन आणि आपले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सिंचन प्रकल्पाला विरोध झाला म्हणूनच हे प्रकल्प होऊ शकले नाहीत असे सांगून त्यांनी आपल्या लेकीला पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या शेतकऱ्यांच्या अन्नात माती काढणाऱ्या राष्ट्रवादीला घरचा रस्ता दाखवा एकजुटीची ताकद दाखवायची असेल तर डॉ प्रीतम मुंडे यांना विजय करणे आता गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले म्हाळसजवळा याठिकाणी न भूतो न भविष्यती अशी भव्य जाहीर सभा पार पडली सभेनंतर भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांनी घेतलेल्या भूमिकेला जोरदार समर्थनच दिले

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review