ताज्या बातम्या

कुलभुषण यांना सोडून आणा अन् ५६ इंचाची छाती दाखवा स्व. मुंडेंचा खरा वारसा धनंजय मुंडे चालवतात -शरद पवार

कुलभुषण यांना सोडून आणा अन् ५६ इंचाची छाती दाखवा
स्व. मुंडेंचा खरा वारसा धनंजय मुंडे चालवतात -शरद पवार

आष्टी (रिपोर्टर):- स्व. गोपीनाथराव मुंडेंचा वारसा धनंजय मुंडे अत्यंत प्रभावीपणे पुढे नेत असल्याचे सांगत नरेंद्र मोदींनी माझ्या घरची चिंता करून नये, ते एकटे आहेत परंतु माझं घर भरलेलं आहे. असे सांगून पुलवामा हल्ल्यात चाळीस जवान शहीद होतात. जवानांचे रक्त वाया जावू देऊ नका, जवानांच्या रक्ताचा बदला घेतला, आनंद झाला. अभिनंदन! लोकांना बरं वाटलं. पण आपले चाळीस जवान शहीद झाले तेव्हा ५६ इंचाची छाती तपासली का? असं म्हणत कुलभुषण जाधव यांना सोडवून आणा आणि ५६ इंचाची छाती दाखवा, असं आव्हान पवारांनी या वेळी मोदींना दिले. या वेळी शिवसेनेचे माजी आमदार प्रा. सुनिल धांडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रथमच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून बोलताना धांडेंनी सुरेश धसांसह जयदत्त क्षीरसागरांवर आक्रमक हल्ला चढवला. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे समर्थन केले.

शरद पवार आष्टी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बोलत होते. या वेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार राजेंद्र जगताप, माजी आमदार सुरेश नवले, माजी आमदार सिराज देशमुख, माजी आमदार जनार्दन तुपे, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार सुनिल धांडे, लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, अशोक हिंगे, सुभाष राऊत, शिवाजी राऊत, अक्षय मुंदडा, महेबूब शेख, बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, महेंद्र गर्जे, राजेंद्र सानप, अण्णा चौधरी, मिनाक्षी पाडुळे, रेखाताई फड, चंपावतीताई पानसंबळ, ह.भ.प. बोधले महाराज, डॉ. सोनवणे, बापूसाहेब डाके, किशोर नाना हंबर्डे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार म्हणाले की, राजकारण समाजकारण करताना माझ्या डोळ्यासमोर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. सामान्य माणसाला अधिकार देऊनच आजपर्यंत लोकशाही टिकवली. परंतु या लोकशाहीवरच टाच आणण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचे सांगत शरद पवारांनी स्व. सुंदरराव सोळंके, लक्ष्मणराव जाधव या जुन्या सहकार्‍यांच्या आठवणींना उजाळाला दिला. आजही स्व. गोपीनाथरावांची आठवण येत असल्याचे सांगत मी सत्ताधारी पक्षात होतो, ते विरोधी पक्षात होते. शाब्दीक चकमकी आमच्या नेहमी झाल्या मात्री व्यक्तीगत सलोखा आम्ही कधी बिघडू दिला. त्याच्यामुळे मागच्या वेळी आम्ही उमेदवार दिला नाही. नशिकमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने आम्ही स्कॉलरशीप सुरू केल्याचे सांगत गोपीनाथ मुंडेंनी मोठ्या कष्टाने नाव कमावलं, मुंडेंचा वसा घेऊनच धनंजय मुंडे काम करत आहेत याचा मला आनंद आहे. स्व. मुंडेंचा वारसा धनंजय मुंडे चालवत आहेत. असं सांगत बजरंग सोनवणे हा कर्तृत्ववान आहे. तो उडी मारल्याशिवाय राहणार नाही. यशाचा पर्वत घेऊनच येईल, म्हणूनच बजरंगला उमेदवारी दिली. भाजप आणि सहकारी बाजुला सारुन सर्वांनी एकत्रित येणं ही राष्ट्रीय गरज असल्याचे सांगत बीड जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. ही चिंतेची बाब आहे. फिटलं अन् मिटलं म्हणा म्हणणार्‍या नाना पाटलांच्या जिल्ह्यातूनच देशातल्या शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतल्याचे पवारांनी या वेळी म्हटले. पुढे बोलताना पवार म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण देतो, म्हणाले ते अद्याप दिले नाही. मराठ्यांना आरक्षण देतो, फटाके फोडा म्हणाले, तिथेही कोर्टाने स्थगिती दिली. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबतही तेच. सत्ताधारी फक्त फसवतात, अशा धोका देणार्‍या विचारसरणीच्या हातात सत्ता देऊ नका. अभिनंदनला देशाच्या आणि जगाच्या दडपणामुळे पाकिस्तानला सोडावं लागलं. हिम्मत असेल तर कुलभुषण जाधव यांना सोडवून आणा आणि छप्पन इंचाची छाती दाखवा, जवानांनी कष्ट केले, त्याचा लाभ राज्यकर्ते घेत आहेत हे दुर्दैव. मोदींना विनंती, ज्यांनी त्याग गेला त्यांचा सन्मान करणं हे कर्तव्य आहे, ते उत्तम पदाची किंमत आहे आणि त्या पदाची किंमत ते ठेवतील. गेल्या पाच वर्षात जे प्रश्‍न सुटले नसतील ते प्रश्‍न सोडवण्यासाठी बजरंगच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. पालकमंत्र्यांच्या कारखान्याने पैशे थकवले, त्यांना नोटीशी निघाल्या परंतु बजरंगने पैसे दिल्याचे सांगितले. कोणी इकडे-तिकडे जात असेल, त्याकडे लक्ष देऊ नका. यश आपले आहे, असे म्हणत एकजुटीने एकमुठीने उभे राहा, आणि केंद्रातलं सरकार उलथवून टाका, असे आवाहन यावेळी पवारांनी केले.

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review