ताज्या बातम्या

आम्ही शिवछत्रचे स्वाभिमानी कार्यकर्ते; अमरसिंह पंडितांच्या शब्दापुढे जाणार नाहीत


तक्रारीच्या सुरानंतर बजरंग सोनवणेंना लिड देण्याचे घेतले वचन 
गेवराई (रिपोर्टर):- आम्ही शिवछत्र परिवारातील स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत, जिल्ह्यात साहेबांची मान ताठ ठेवण्यासाठी आम्ही बजरंग सोनवणे यांना मताधिक्य देऊ. सोनवणेंना सर्वाधिक लिड गेवराई मतदारसंघात मिळेल, असं म्हणत गेवराई तालुक्यातील अमरसिंह पंडित समर्थकांनी अगोदर तक्रार करत अमरसिंह पंडितांच्या शब्दापुढे जाणार नाहीत, हे स्पष्ट केले. 
   अनपेक्षितपणे राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी आल्यानंतर अमरसिंह पंडितांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. तीन दिवसांपूर्वी गेवराईत होणारी बैठक रद्द झाली. त्यानंतर अमरसिंह पंडितांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी बुथ कमिटीच्या सभांमध्ये सोनवणेंना निवडून आणण्याचा निर्धार केला. आज सकाळी अकरा वाजता कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी गढी येथील जयभवानी मंदिरातील सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक सुरू झाली. या बैठकीला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच कार्यकर्त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार मांडली. अनेकांनी पोटातलं ओठात आणलं मात्र सरशेवटी आम्ही शिवछत्र परिवारातील स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत, अमरसिंह पंडितांनी दिलेला शब्द कार्यकर्ते नक्कीच पाळणार. जिल्ह्यात साहेबांची मान ताठ ठेवण्यासाठी आम्ही बजरंग सोनवणे यांना मताधिक्य देऊन गेवराई तालुक्यातून सर्वाधिक लिड असेल, असा विश्‍वास दिला. या बैठकीला अमरसिंह पंडितांसह विजयसिंह पंडितांनी संबोधले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review