ताज्या बातम्या

मध्येरात्री बीड शहरात चार घरे फोडली; १६ तोळे सोन्यासह १ लाख २९ हजार रुपये लंपास

मध्येरात्री बीड शहरात चार घरे फोडली
१६ तोळे सोन्यासह १ लाख २९ हजार रुपये लंपास
बीड (रिपोर्टर) :- चोरट्यांनी बीड शहरातील बंद घरे टार्गेट करत सोमवारच्या मध्यरात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल चार घरे फोडत धुमाकूळ घातला. वैभव कुलकर्णी यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठत १६ तोळे सोन्यासह १ लाख २९ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची फिर्याद दिली. इतर घरातील किती मुद्देमाल लंपास झाला हे मात्र समजूशकले नाही. 
शिवाजीनगर पोलिस ठाणेहद्दीत सोमवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री विश्‍वासनगर पांगरी रोड, बीड येथील दोन व गुरुकुल इंग्लिश स्कुल परिसरातील दोन असे एकूण चार घरे चोरट्यांनी फोडले. दुपारपर्यंत वैभव कुलकर्णी रा. विश्‍वास नगर पांगरी रोड बीड यांनी घरात चोरी झाली असल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यांच्या घरी कोन्ही नसल्याचा फायदा घेत. चोरट्यांनी मध्यरात्री घरात प्रवेश करत घरातील कपाटामध्ये ठेवलेले १६ तोळे सोने, एक लाख २९ हजार रुपये लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारच्या घराकडे नेला मात्र तेथे त्यांचा सुगावा न लागल्याने त्यांनी गुरुकुल इंग्लिशस्कुल परिसरातील दोन बंद घरे फोडले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यांनी दुपारी उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review