ताज्या बातम्या

मेहुण्याने केला दाजीवर प्राणघातक हल्ला,प्रकृती चिंताजनक


प्रकृती चिंताजनक, स्वाराती रुग्णालयात प्रथमउपचार करुन लातुरला रवाना
अंबाजोगाई (रिपोर्टर)
घरगुत्ती कारणावरुन बायकोच्या भावाने दाजीवर प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता. आंबाजोगाईच्या मोंढा परिसरात घडली. जखमीवर स्वराती रुग्णालयात प्रथमउपचार करुन पुढील उपचारासाठी लातुरला हलवले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गणेश लहू खोट (वय २२ वर्षे रा. सावळेश्‍वर पैठण ता. केज)  हे स्वत:चा टेंपो घेवून अंबाजोगाईच्या मोंढ्यात आले होते. यादरम्यान त्यांच्यात आणि त्यांच्या मेहूण्यात घरगुत्ती कारणावरुन वाद सुरु झाला. यानंतर मेहूण्याने दाजी गणेश खोट यांच्या दिनेश विट भिरकावली ती विट खोट यांच्या डोक्यात लागली असल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजन असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातुर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review