ताज्या बातम्या

गेल्या पाच वर्षात खा.मुंडेंनी एकातरी शिवसैनिकाला खासदार फंड दिला का?, शिवसैनिकांचा सवाल 


शिवसैनिकांचा संपर्कप्रमुखांच्या बैठकीत सवाल 
शिरूर (रिपोर्टर):- शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचा दौरा करत असून ठिकठिकाणच्या बैठकांमधून शिवसैनिक भाजपा नेतृत्वावर कमालीचे संतप्त असल्याचे दिसून येते. आज शिरूरमध्ये शिवसैनिक आणि पदाधिकार्‍यांनी भाजपा नेतृत्वाबाबत संताप व्यक्त करत गेल्या पाच वर्षात खा. प्रीतम मुंडेंनी एका तरी शिवसैनिकाला तीन लाखाचा तरी खासदार फंड दिला का? असा सवाल  बैठकीत आनंद जाधव यांच्यासमोर केला. 
   बीड जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुखपदी आनंद जाधव यांची निवड झाल्यानंतर जाधवांनी जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी आणि शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मरगळलेल्या शिवसेनेला जाधव आल्यापासून संजिवनी मिळाली. शिवसैनिकांना ऊर्जा मिळाल्याचे दिसून येत आहे. आनंद जाधव अत्यंत शिस्तप्रिय असल्याने शिवसेनेचे पदाधिकारीही अंग झटकून कामाला लागले आहेत. पंधरा दिवसांच्या अल्टिमेटनंतर कामाचा आढावा घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आनंद जाधव तालुकानिहाय बैठका घेत आहेत. या बैठकांमधून भाजपा विरोधात शिवसैनिकांचा संताप आनंद जाधवांना दिसून आला आहे. आज जाधव यांच्या उपस्थितीत शिरूर येथे शिवसैनिकांची बैठक झाली.  या बैठकीतही शिवसैनिकांनी भाजपा नेतृत्वावर नाराजी आणि संताप व्यक्त केला. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपा खासदार प्रितम मुंडे यांनी तीन लाखांचा तरी खासदार फंड एकाद्या शिवसैनिकाला दिला का? असा सवाल शिवसैनिकांनी विचारला. या वेळी आनंद जाधवांनी पक्षाची भूमिका पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे आदेश हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आता युती झाली आहे त्यामुळे त्यांनाही सन्मान द्यावाच लागेल. तुम्ही-आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. स्वाभिमान, अभिमान हा आमच्या नसानसांमध्ये आहे. ते त्यांनाही माहित असल्याचे जाधवांनी म्हटले. परंतु भाजपाविरोधात ठिकठिकाणच्या बैठकांमधून शिवसैनिकांचा संताप दिसून येत आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review