ताज्या बातम्या

अमरसिंह पंडित समर्थकांची उद्या जयभवानी मंदिरात बैठक


बैठकीकडे सर्वांचे लक्ष; अमरसिंह, विजयसिंह पंडितांची राहणार उपस्थिती 
बीड (रिपोर्टर):- राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी अचानक बजरंग सोनवणे यांची उमेदवारी आल्याने नाराज असलेल्या पंडित समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या सकाळी अकरा वाजता जयभवानी मंदिरात होत असून या बैठकीला राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडितांची उपस्थिती राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमरसिंह पंडित बजरंग सोनवणेंना विजयी करण्याचा निर्धार वेगवेगळ्या सभांमधून करताना दिसून येतात. उद्या आपल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या बैठकीला ते सामोरे जाणार आहेत. 
   बजरंग सोनवणे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर गेवराई तालुक्यातील पंडित समर्थकांनी नाराजीचा सूर आवळला. पंडित नाराज असल्याच्या बातम्याही बाहेर आल्या मात्र परवा पाटोदा येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावून मी नाराज नाही आणि बजरंग सोनवणेला खासदार करणारच, अशी भूमिका घेत अमरसिंह पंडितांनी माझं अख्खं घर शरद पवारांचा आदेश पाळणारं आहे. त्यामुळे माझ्यासाठी माझ्या वडिलांनी जे केले तेच बजरंगसाठी ते करतील. घरातले सर्वच जण प्रचारासाठी लागतील, असे माजलगावमध्ये म्हटल्यानंतर पंडितांची नाराजी दूर झाल्याचे उघड होते. आता कार्यकर्त्यांचे मन शांत करण्यासाठी आणि पक्ष आदेश महत्वाचा हे सांगण्यासाठी उद्या सकाळी अकरा वाजता गढी येथील जय भवानी मंदिरात माऊली सभागृहामध्ये गेवराई तालुक्यातील पंडित समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत गेवराई तालुक्यातील कार्यकर्ते आणि अमरसिंह पंडितांसह विजयसिंह पंडित हेच उपस्थित राहणार आहेत. सदरची बैठक दारबंद असणार असल्याचे सांगण्यात येते. या बैठकीतून राष्ट्रवादीचा उमेदवार लोकसभेत पाठवायचा आणि जास्तीत जास्त तालुक्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी लिड द्यायची ही भूमिका ठरवली जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या प्रश्‍नांना पंडित काय उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review