ताज्या बातम्या

विद्यार्थिनीला मारहाण  बारा जणांविरुद्ध गुन्हे दाखल


बीड (रिपोर्टर):- बारावीची परीक्षा देणार्‍या एका विद्यार्थिनीला उचलून नेऊन तिला बेदमपणे मारहाण करण्यात आल्याची घटना १५ मार्च रोजी घडली. या प्रकरणी शिक्षकासह बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकार नेमका कुठल्या कारणावरून झाला हे अधिकृतरित्या समजू शकले नाही. 
ग्रामीण भागातील एक विद्यार्थिनी बीड शहरामध्ये १५ मार्च रोजी परीक्षा देण्यासाठी आली होती. पेपर झाल्यानंतर काही लोकांनी तिला रिक्षा बसवून एका अज्ञातस्थळी नेले व त्याठिकाणी तिला बेदमपणे मारहाण केली. यात सदरील विद्यार्थिनी जखमी झाल्याने तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून अनिस, अशफाक सर यांच्यासह बारा जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. अधिक तपास पीएसआय ढगारे करत आहेत. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review